सनातन वैदिक धर्म कि जय हो !! हि घोषणा आपण अनेकदा देतो आणि हि घोषणा आईकलि तरी आपल मन अभिमानानी भरून येत. आपल्याकडील उज्ज्वल अशी वेदांची परंपरा आपल्या मनामध्ये क्षणभर आठवून जाते. खरच आहे, अनेक अनेक हजारो वर्ष हि परंपरा चालत आली आहे. वेद हे संपूर्ण शास्त्रावर आधारित आहेत हे सुद्धा आता सिध्द झालेलं आहे. आणि हि परंपरा अजूनही टिकून आहे याच संपूर्ण श्रेय जे ब्राह्मण विद्यार्थी मोह बाजूला ठेऊन वेद शिक्षणाकडे वळतात त्याला जात. हि मुले ज्या अर्थी वेद पारंगत होतात त्या अर्थी यांना सरस्वती नक्कीच प्रसन्न असते. खरतर हि मुले जर अभियांत्रिकी किंवा वैद्यक शास्त्राकडे वळली तर आजही लोखोनी पैसे मिळवू शकली असती आणि समाजात मान सुद्धा !!! पण याकडे दुर्लक्ष करून हे ब्राह्मण पैशाची फारशी शाश्वती नसलेल्या आणि समाजात मान नसलेल्या मार्गाकडे वळतात !!!! खूप आश्चर्य वाटतंय??? "समाजात मान नसलेल्या" असे शब्द वापरले म्हणून ?? तुमच्या पैकी काही जणांच्या हे डोक्यात आल असेल कि ज्या व्यक्तींना घरी बोलावून आपण देवाला करतो तसा नमस्कार करतो त्यांना समाजात मान नाही अस मी कस म्हणू शकते ? पण आज मी खरच या विचारापर्यंत आले आहे कि यांना खरच मान आपण देत नाही आणि याला कारणीभूत आपला समाज, आणि मुख्यत: आपण ब्राह्मण लोकच आहोत.
आता थोडा कारणांचा अभ्यास करूयात. आमच्या ओळखीतल्या एका गुरुजींची मुलगी लग्नाची होति. तिचे वडील वैदिक, घरामध्ये वैदिक धर्म सेवेचीच परंपरा, भाऊ पण वेद विद्यापीठात शिकत आहे तरीसुद्धा तिला वैदिक नवरा नकोय !! हे मला कळल तेव्हा मला वाटल कधी कधी आपल्याला अस वाटत कि काहीतरी वेगळ असाव आयुष्यात त्याप्रमाणे घरात सतत वैदिक वातावरण असल्याने तिला बदल हवा असेल पण तिच्याशी गप्पा मारण्याचा योग आला तेव्हा समजल कि प्रकरण वेगळ आहे. ती जेव्हा शाळेत होती तेव्हा तिच्या वर्गातले तिचे ब्राह्मण मित्र आणि मैत्रिणी 'हिचे वडील गुरुजी आहेत' अशी कुजबुज करायचे आणि अनेकदा मैत्रिणी कुचकट भावनेनी 'माझे वडील अमुक तमुक आहेत आणि आमच्याकडे एवढा मोठा फ्ल्याट आणि गाडी आहे' अस म्हणून मुद्दाम तिला हिणवायच्या. शाळेत फारशी अक्कल नसते अस जरी मानल तरी या सर्वांच्या घरचे सुद्धा याच तर्हेचे. मैत्रिणीचे मोठ्या हुद्द्यावरचे वडील "तुझे वडील काय करतात?" या त्यांच्या प्रश्नावर उत्तर मिळाल्यावर भुअवय उन्चवायचे आणि लगेच फारशी किंमत न देता आपल्या मुलीला "तुला नवीन गाडी घायय्चीय का या वर्षी?" अस मुद्दाम कुत्सित पणे विचारायचे. या सगळ्यामुळे या गुरुजींच्या मुलीनी लहानपणापासून मनात एकच ग्रह करून घेतला 'आपल्याला समाजात किंमत नाही, आता नवरा मात्र आपण असाच मोठ्ठ्या कंपनीतला शिकलेला पाहायचा.
वरील किस्सा कळल्यावर मला फार वाईट वाटल. मध्ये एकदा गप्पा मारता मारता एक ओळखीच्या madam म्हणाल्या होत्या "आम्ही दर वर्षी गुरुजींसाठी वधू वर मेळावा ठेवतो पण दर वर्षी २०० - ३०० वैदिक पुरुष जमतात आणि मुली फक्त जेमतेम ३० - ४०. त्याहि अशा मुली ज्यांच्यामध्ये काहीतरी दोष आहे किंवा ज्यांना सगळीकडून नकार स्वीकारावा लागला आहे." हि आकड्यांची तफावत पाहता धक्का बसतो. अस का व्हाव ? बर या गुरुजींना पैसे कमी मिळतात का? खर तर तस नाहीये, एखादा अभियंता कमवू शकेल इतक सुद्धा हे लोक कमवू शकतात पण २०००० चा IT वाला चालेल पण ४०००० वाला वैदिक मुलगा नको अस आज मुली म्हणतात. आणि हेच मत मुलींच्या पालकांचं पण असत. एकदा म्हणे एका मुलीनी लग्नासाठी अशी अट ठेवली कि "माझ्याबरोबर सिनेमा पाहायला येशील तेव्हा ते धोतर नाही ह घालायचं, मला लाज वाटेल तुझी बायको म्हणून मिरवायला आणि दर आठवड्याला hotelling करायचं, मान्य आहे का ?" त्या वैदिकाने हे सर्व ऐकल्यावर नकार दिला.
मला खर तर या सगळ्यामध्ये मुलींना दोष द्यायचा नाहीये कारण अशा प्रकारे त्यांना विचार करायला लावणारा आपला समाजच आहे. कारण सत्य तर हे आहे कि आपल्याला वैदिक हे समाजात फक्त 'आशीर्वाद मिळवून आपल भल करण्यासाठी' हवे आहेत. एकदा का घरी त्यांना नमस्कार केला कि घराबाहेर आपण यांना, त्यांच्या पावित्र्याला, त्यांच्या पोशाखाला आदर देत नाही. हे खूप भयाण आहे पण सत्यच आहे !!!! आपल्याला फक्त घोषणेमध्ये वैदिक धर्म आठवतो, फक्त मनात अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला वैदिक धर्म जिवंत लागतो. आणि घरामध्ये पूजा करवून आशीर्वाद घेण्यासाठी फक्त आदर्श, सर्व पाळणारा वैदिक ब्राह्मण लागतो !!!!
या सगळ्यावर आपण सर्वांनी चिंतन केल पाहिजे आणि काहीतरी उपाय शोधला पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या ३ ४ पिढ्यान नंतरच्या मुलांना 'भारतात पूर्वी 'वेद' नावाचे ग्रंथ गुरुजींच्या घरी राहून शिकवले जायचे पण काही वर्षांपूर्वी हि प्रथा बंद पडली' अस इतिहासाच्या पुस्तकात वाचायची वेळ येईल.
छान लिहिले आहेस.. पण आपला समाज काळा प्रमाणे बदलून खूप पुढे गेला. पण प्रगती करताना आपली परंपरा आणि संस्कृती विसरत चाललंय.. मुलीना लाज वाटते कारण पौरोहित्य करणाऱ्या मुलगा त्या मुलीला तिच्यावर थोडी बंधने आल्या सारखी वाटतात... आणि stability नाहीये.. आज पौरोहित्य चालू आहे.. उद्या नाही चालले तर काय? हा प्रश्न त्यांना पडतो.... मुलांनी पण ह्या शिक्षणा बरोबर लौकिक शिक्षण पण घायायला पाहिजे.. (सर्व जण घेतात असे नाही...)
ReplyDeleteधन्यवाद स्वप्नील. पण मला नाही वाटत कि 'बंधन येणे किंवा income शी शाश्वती नसणे म्हणून लाज वाटते. मला अस वाटत आपण आपल्याच नकळत या शुध्द आणि सात्विक गोष्टीपासून इतके लांब गेलो आहोत कि या गोष्टींशी आयुष्याशी संबंध येण हे आपल्याला विचित्र आणि odd वाटायला लागल आहे. आणि ह्यावर ठोस उपाय झाला नाही तर पुढे वाईट परिस्थिती उद्भवेल
Deleteतुझा हा मुद्दा बरोबर आहे . कारण आत्ता कलियुग मध्ये तामसी वृत्ती खूप वाढली आहे.. आणि त्यामुळे लोकांचा धर्म आणि कर्मकांड या वरील विश्वास उडत चालला आहे. संस्कार विसरत चालले आहेत. प्रलोभने वाढली आहेत. याला वेळीच आला घातला पाहिजे. आणि पौरोहित्य करणारी मुलाने पण कला प्रमाणे बदल करताना आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा विसर पडता कामा नये.
Deleteवरील अभिप्राय बरोबर आहे'त्याच्याशी सहमत
ReplyDeleteधन्यवाद
Deleteप्रत्येक क्षेत्रात धोके आणि चांगल्या सोयीसुविधा आहेत. वैदिक/पौरोहित्य व्यवसायात भौतिक सुखाचा विचार होऊच नये. आणि तो होत असेल तर मग पौरोहित्य म्हणजे केवळ एक पोपटपंची ठरेल. मुलीने जी अपेक्षा व्यक्त केली आहे की सिनेमाला जाताना धोतर नेसू नये यात मला काही वावगं वाटत नाही. त्या मुलीची खरी तशी अपेक्षा असू शकेल की आपला तरुण नवरा धोतर नेसून येऊ नये. आणि मुळात धोतर न नेसल्याने आपल्या संस्कृतीचा अपमान अथवा अवमूल्यन होते का? या सर्व बाह्य गोष्टी आहेत.
ReplyDelete.
मुळात आधी ब्राह्मण वर्गाने (पौरोहित्य करणाऱ्या वर्गाने जास्त आणि बाकीच्यांनीही) आपले कर्तव्य काळानुसार ओळखले पाहिजे. दलित अथवा समाजाच्या अंतिम स्तरातील घटकाकडे आपण कधी पोहोचलोच नाही. ती दरी आज स्वतःहून कमी करण्याची आवश्यकता आहे. मंदिरातील काम संपल्यावर दलित वस्तीत जाणे, त्यांना मंदिरप्रवेश मिळवून देणे या आणि अशा गोष्टी करायला हव्यात. अन्यथा ख्रिस्ती मिशनरी आणि इस्लाम आहेच, "सेवेशी सादर!" .
.
पण या वर्गाची परवड चालू आहे हे खरेच. जर बाईक/मोबाईल/इयरफोन/नेट/फेसबुक चालू शकते तर धोतराची घडी करून ठेवायला अडचण येऊ नये. असो. चांगल्या विषयाला तोंड फोडले आहेस. माझ्या आगामी लेखातील एक लेख या विषयावर आहे. keep checking .. www.vikramwalawalkar.blogspot.com
यथार्थ लेख, सायली!
ReplyDeleteअगदी योग्य मुद्दा मांडलास तू. मुलींचीही विचारशक्ती खुंटली आहे का - हा प्रश्न पडतोच आहे. सोवळे पाळणे इत्यादि गोष्टींबद्दल त्यातल्या 'स्वच्छते'च्या पलिकडचा 'पवित्रते'चा भाग समजून न घेणार्या हल्लीच्या शिक्षणामुळे तर हे होत नाहीये ना ? अनेक मुद्दे आहेत, पण हा देखिल एक आहे असं प्रकर्षाने जाणवतं.
खूप छान विचार मांडले आहेस. असेच काम होत राहावे ही श्री गुरुचरणी प्रार्थना .
ReplyDelete