Tuesday, January 25, 2011

राधा - भक्त का प्रेयसी

             घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.
            मला मात्र त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना मी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून मला असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.
             आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -

. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.
. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.
. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते
      
एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -

'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '

       
आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावेश्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

24 comments:

  1. सायली, ब्लॉगविश्वात तुझे मनापासून स्वागत! हा लेख तर छानच आहे! अजून खूप काही तुझ्याकडून लिहिले जावे या शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. काल ब्लोग सुरु करतांना आपलं बोलणं (आणि technical guidance session वगैरे :p) झालंच आहे तरी पुन्हा एकदा सुस्वागतम!!!!

    ReplyDelete
  3. lekh vachun baryach lokan chya radha -krishna badal chya chuki chya samajuti dur hotil.

    tasech asha balagu ki ya pudhe raaskrida hi vastavik dakhavtil, tya kade profession or business or entertainment manun paahu naye.

    Work of sayali thatte is superb, g8, keep it up.
    ase ch lekh lihun lokan che dole ughad. Good bless you...

    ReplyDelete
  4. धन्यवाद श्रेया, वेधस आणि निखील. मी अजून जास्तीतजास्त चांगले लेख लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करीन.

    ReplyDelete
  5. The way relationship or Radha and Krishna is taken by anyone is dependent on every individual objective of existence in his or her life. We ourselves have not learned it properly, not even all our senior respected people.

    If you look at all aspects of our Hindu Culture, I am calling it as culture because it is way of living your life it is not religion. So if study it properly it is purely the "Devotion" "Safety" for every "Thing" that exists as nature. So it is nothing but "Love" to keep the earth mother safe and so in every story if you call it may be "Mahabharata" or "Ramayana" or in any other stories it is only love that is explained. you may call it "Bhakti"...

    Sayali Good you are writing on such subject..oy tusi gr8 ho !!!

    ReplyDelete
  6. तरूण पिढीनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे पण निदान वागताना देवाच्या नावावर खपवू नये निदान त्यात काही अर्थ नसताना मग त्यांनी ते प्रेम भक्ती समजली तरी हरकत नाही. लिव्ह इन रिलेशनशिप ला मान्यता देताना आपल्या कोर्टानी 'श्रीकृष्ण आणि राधा' बद्दल काय वक्तव्य केल आहे ते इथे बघा -

    http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marital-sex-not-an-offence-SC/articleshow/5716545.cms

    ReplyDelete
  7. Lekh ani tuze prayatn chhan aahet. Lokanchya gairsamjuti dur honyas te arthatach madat karel. Ti mahatvapurn mahiti mi lokana sanyacha prayatn karel. Dhanyavad!

    ReplyDelete
  8. सायली..खूप छान लेख लिहिलास.छान सुरुवात झाली.राधा जी भक्तीच प्रतिक आहे.जिच्या नावाचा कुठेही भागवतात उल्लेख नाही.एक 'आराधिका'अस फक्त म्हटलंय.तिचा कृष्ण शेजारी उभा असलेला फोटो किंवा मूर्ती हे मनुष्याच्या मनातून साकारलेल रूप आहे.त्याला आध्यात्मिक,पौराणिक आधार कुठेही नाही.असे सुंदर लेख लिहून तू चांगले उद्बोधन करीत आहे.श्री गुरु तुला चांगली प्रेरणा देऊन तुझ्याकडून जास्तीत जास्त आणि उत्तमोत्तम काम करून घेओत ही ईश्वर चरणी प्रार्थना..

    ReplyDelete
  9. सायली..खूप छान लेख लिहिलास.छान सुरुवात झाली.राधा जी भक्तीच प्रतिक आहे.जिच्या नावाचा कुठेही भागवतात उल्लेख नाही.एक 'आराधिका'अस फक्त म्हटलंय.तिचा कृष्ण शेजारी उभा असलेला फोटो किंवा मूर्ती हे मनुष्याच्या मनातून साकारलेल रूप आहे.त्याला आध्यात्मिक,पौराणिक आधार कुठेही नाही.असे सुंदर लेख लिहून तू चांगले उद्बोधन करीत आहे.श्री गुरु तुला चांगली प्रेरणा देऊन तुझ्याकडून जास्तीत जास्त आणि उत्तमोत्तम काम करून घेओत ही ईश्वर चरणी प्रार्थना..

    ReplyDelete
  10. Hello All, just go through this link :

    http://arisebharat.wordpress.com/2010/03/29/supreme-court-insults-hindus-by-referring-radha-krishna-premarital-sex/

    ReplyDelete
  11. sayli.. tu evdhe bhari lihtes?? nawin aahe he mala.. khupp chan.. ajun nawin nawin wishyawar wachayla nakki awdel.. :)

    ReplyDelete
  12. sayli.. tu lihtes pan?? nawin aahe mala he..
    chan chan.. ajun nawin nawin wishyanwar wachayla khuuppp awdel.. wichar swacha ani spasta aahet. awadlay!! :)

    ReplyDelete
  13. Ok, now with these points in perspective,I do not agree with the points that this article+your comments put forward here . But I would even on further to say, IF relationship between Krishna and Radha was portrayed as love in the ancient texts, even in that case, there is absolutely nothing wrong with that.

    "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं. ही पळवाट का?? Why not answer uncomfortable questions? Or think about it the other way, why the question was 'perceived' uncomfortable? What is 'so' wrong with it if there was any chemistry/love one-sided/two-sided whatever???

    I totally agree with what Mukund said, and you missed the whole point. Be open to opinions, and not so conservative! That is what "Hinduism" preaches us, its the only philosophy open to all sorts of belief systems, INCLUDING atheism. Read Mukund's comment again!!!

    Also if possible, read more about Hinduism on wiki (PLUS philosophies in the right margin are a good start) and this article

    Good luck with blogging though! Keep writing!

    ReplyDelete
  14. Saylee, if u still want to improve Please refer our Gurusava Trimasik - RAS KRIDA PART 1 & 2.

    ReplyDelete
  15. वेधस(Sahdev) - प्रथम तू तुझ मत दिल्याबद्दल धन्यवाद. तू जे 'IF relationship between Krishna and Radha was portrayed as love in the ancient texts, even in that case, there is absolutely nothing wrong with that. ' हे बोलतोस त्याचा इथे विचार करण्याचा प्रश्नच येत नहीं कारण मी लेखातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की श्रीकृष्ण यांच्या रासक्रीडेचा अर्थ लोक वेगळा घेतात, त्यामुळे जर-तर बद्दल बोलायलाच नको. जी गोष्ट श्रीकृष्ण यांनी आयुष्यात कधी केलीच नाही ती 'जरी त्यांनी केली असली तरी' अस म्हणून त्यावर वायफळ चर्चा नको. प्रेम ही खूप पवित्र आणि छान भावना आहे आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते त्यामुळे गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते हे मान्य पण त्याला 'बोय-फ्रेंड, गर्ल-फ्रेंड' किंवा 'लिव इन रिलेशनशिप' हे नाव देण्यात येणार असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. माझा आक्षेप या उपमांना नसून या उपमा श्रीकृष्णांना कारण नसताना दिल्या जात आहे यावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी उत्तर देताना पळवाट काढली असा अर्थ कृपया घेऊ नये कारण एक तर मी पाच वर्षांच्या मुलाशी त्यावर बोलत होते त्यामुळे या विषयावर आणखीन सांगायला गेले असते तर त्याच्या चौकस बुद्धीच्या पुढे येणार्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा अभ्यास नव्हता आणि म्हणुनच मी तो नंतर केला आणि मग त्याला नीट समजावून सांगितले. (त्याला मी नंतर समजावून सांगितले हे लेखात दिलेले नाही कारण मला तशी गरज वाटली नाही)
    मी कसं आणि काय उत्तर दिलं यापेक्षा मला जो संदेश पोचवायचा आहे तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटत.

    ReplyDelete
  16. सुस्वागतम,

    सायली, ब्लॉगविश्वात तुझे मनापासून स्वागत! हा लेख तर छानच आहे! अजून खूप काही

    तुझ्याकडून जास्तीत जास्त आणि उत्तमोत्तम लिहिले जावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.. आणि

    शुभेच्छा!

    ReplyDelete
  17. chan lekh lihila aahes . khup khup shubhecha!

    ReplyDelete
  18. Sarva pratham ki lok Bhagwan Shri. Radha Krushanna baddal je boltat tar jase saylinich namud kelai ki ShriKrushannache wai 10 chya aat hote wagare. Tasech Bhagwatat ha hi ullekh ahe ki Shri ji ji stathana sodli ti punhna parat te tithe gele nahit yacha artha saral hoto ki shri lahan astanach raskrida keli hoti ata raskrida mhnje tyanni tyanna lokka samjtat tase kahi nahi tar ishwar swarupache mhnjech "Sachhinand,swarup dhakawle samjavle" pan te madhur bahvatun samjavle mhnun tyas raskrida mhntat ji tyanchi mhnjeche gopichi ichha hoti(purwa janmiche Hrushimunni.
    ata urla prashnna lahan mulala samjavnyacha jase ki tychi budhhi tyche wai wichar ya nushar samjavne apekshit ahe nai ka karan lahan mule hi mati khatat tar tyanna ti na khau dene he mateche kam ahe ani ti tya sathi god bolun kiva marun tyla te karu det nahi karan ti waiyani,budhhi ani samj yat saglya abjuni mothi ahe. ani samorchya la ji bhasha kalte tya bhashet bolne samjve yalach shahanpan mhntat.

    ReplyDelete
  19. Thanks Dhananjay for your inputs. Thanks Sudhir sir and Akshay

    ReplyDelete
  20. Sayali nice one!!!!
    Blog var lihun chaan keles.
    Actually your subject is very abstruse.. :-)

    Just like vedhas I also agree with Mukund what he said is absolutely right.And he has given a nice message in few words.

    Actually it is very difficult to distinguish between Love and Lust.Jyat Love hi Adhyatmik gosht tar Lust hi Bhautik gosht ahe. Ani jenvha tumhi Adhyatimk goshtila bhautik goshtishi(grlfrend,boyfrend,live in relaionship etc...) compare kele tar hati kahich padnar nahiye.. Arthatach hya baddal bolatana apli bouddhik zep hi kami padate hyat kahi shanka nahi....

    He jyala kalale tyala Krishna ani Radha baddal kahi sangnyachi garaj nahi ani jyala nahi kalale tyala sangnyat artha nahi ase mala vatate :-)

    ReplyDelete
  21. Hi Sayali,

    Yes I am with you. The relationship of "Radha" and "Krishna" should not be depicted in wrong manner and agree with Sayali and Sayali I am with you 100%.

    As Vedhas and Ajay are agreeing on what I said, let me elaborate it little further.

    It is Hinduism, again way to live life, is the only culture that fully teaches and guides man kind to save the Mother Earth. You will find that in our Hindustani Culture only we celebrate Festivals and are directly or indirectly related with Nature.

    All our "Dev" or "Devtas"/ God, are some or the other form of Nature e.g. Shankar / Mahadev that we pray in the form of Pindi. and other important components of Nature who are perceived as form of GOS i.e. Sun, River, Mountains, Trees, cow etc. are the precious sources for us for our life. How?, I need not mention.

    Actually it is Science which the people that time were not able to grasp it as Science. People then were probably not in position to Grasp it as Science and so everything was given form of GOD.

    Now whenever you think of Krishna, what you think is Symbol of Love, Mischievous kid, Krishna who loved cattle, Krishna who loved poor Sudama,Krishna who killed Kansa Mama for the love and affection of simple People then.

    Krishna told us to love and take care of Mountains, River, Cow etc.

    So only in Hinduism which open to accept anything including criticism, as mentioned by Vedhas, the Nature is considered as God. and today the entire world is shouting about saving the earth. Maintain the balance of ECO system etc etc.

    Now what I want to specify is in such country where you have so much variety of common people, it is very much likelihood that they will not understand what Krishna is all about.

    I mean they never understood or were given to understand what the Science is all about or they were not intellect enough to understand the Science. So in our culture everything that was not understood by the common people, was given form of GOD so people will remain afraid of doing so.

    Now in such situation the relation of Radha and Krishna is bound to be miss interpreted or not understood or every one has his or her own version of understanding without knowledge or with knowledge.

    Sayali in such situation even High Court or Supreme Court judge also can give justice to Relation of Krishna and Radha, as it is dependent on their intellect level.

    Sayali still I am with you as far as correcting the people about the relation of Radha-Krishna.

    Tusi gr8 ho!!

    ReplyDelete
  22. Ata rahila vishai ajchya pidhicha tar ajichi pidhi mhnjech me swatha ani apan sagle sudhha yatch yeto tar ajchi paidhi fakt INSTANT ani Tatpurtya goshti kade phahte dusra ki ti saglya goshti hya aplya hishobani aplya faidya sathi valu phate.jase tyache prem he kiti kharai he sangaila te SHRI KRUSHANNA ANI RADHE cha adhar ghetat . PARAM PUJYA SWAMI SHRI RAMKRUSHNA SARASWATI sangtat mhntat jyanni ISHWAR ANUBHUTI ANI ANUGRAHA KIVA PRATYAKSHA DARSHAN GHETLAI TYANNACH TYA BADDAL BOLNYACHA ADHIKAR AHE. tar tyach adhara var me ek gosht namud karu ichheto ki Ajkalchi pidhi mhnjech apan kuthlyahi goshticha nit abhyas na karta sakhol vichar na karta bolto. Shastra, puran granth hyacha vaevasthit abhyas kelayas he prashnna yat kai tathyach naie he lagech janvel. mag ti ajchi pidhhi aso kiva COURT. Rahia vishai Premi premika mhnyacha tar Jar kharach koni "BHAGWAT" grantha wachlai kiva abhyaslai tar to ha prashnna kadhich wicharnar nai ha maja vishwas ahe kiva ya var wichar sudhha karnar nai. KARAN ADHICH MHNTLA TASA KI SHRI KRUSHNNACHE WAI GOKUL SODLE TEVHA 8 TE 10 MADHI HOTE "DUSHRA MHATVACHE KI TYANNI EKDA JE STAN SODLE TYA THIKANI TE PUNHHA KADI AUSHYAT GELE NAHI" ATA YATCH SAGLYA PRASHNANCHI UTTARE ALI KI TE TARUN ASTANA GOKULAT NAVTE.MAG PREMI PREMACHA VISHAICH NAIE. NAI KA...?

    ReplyDelete
  23. MULAT EK HITACHINTAK MHNUN KAHI SANGU ICHEITO RAG MANU NAIE VICHAR KARAVA HYA VAR.
    TAR SWATHA KAVI "KALIDAS" TATSAM VISHIYA VAR KAVITA KIVA SHODHA KARATANACH TYANCHE "ADHAPATAN" JALE AHE
    TE HI SWATHA "SIWA ANI SHAKTI" YACHYA HYACH WISHAYA VAR HYACH SANDHARBAT SHODA KARAT HOTE KIVA LIHU PAHAT HOTE. TAR BAKI APAN SAMJDAR AHATCH APAN THARVA KAITE.....?
    "SHRI GURUDEVDATTA..."

    ReplyDelete
  24. jar kahi chuk jali aslyas ti maji ahe. maje "ADNYAN AHE". kahi sandharbha wagaretil chuka hya majya ahet.
    tari rahun rahun ek goshta wate ki jyanchya bolnyne mhnjech Ajchay pidhichya prashannai Sayli madamni ha lekh lihila tyachaya war namud kelai tasa drushtishekp ani wicharancha chottasa udhaharn deto. mhnje mul prashnnch sutel. ha prakar tasa saglyanna mhiti asel tyann to anubhavala hi asel ajubajula rojch ghadta

    Ekhada mulga kiva mulgi ekdhya mulila kiva mulala aplya bike var kiva sobat firat asel tar lokaa lagech mhntat bhag te dogha Girl Frnd kiva BoyFrnd ahet. yachi shahanisha na karta ki te bhahin bhau pan asu saktat. nai kaa

    ha wicharan madhla fol pana ahe ajkal jo negative phaile ani positive nanter karto fakt faida bhagto swathahacha evdhach.......................!

    ReplyDelete