Thursday, July 11, 2013

वैदिकांना खरच समाजात आदर आहे का?



             सनातन वैदिक धर्म कि जय हो !! हि घोषणा आपण अनेकदा देतो आणि हि घोषणा आईकलि  तरी आपल मन अभिमानानी भरून येत. आपल्याकडील उज्ज्वल अशी वेदांची परंपरा आपल्या मनामध्ये क्षणभर आठवून जाते. खरच आहे, अनेक अनेक हजारो वर्ष हि परंपरा चालत आली आहे. वेद हे संपूर्ण शास्त्रावर आधारित आहेत हे सुद्धा आता सिध्द झालेलं आहे. आणि हि परंपरा अजूनही टिकून आहे याच संपूर्ण श्रेय जे ब्राह्मण विद्यार्थी मोह बाजूला ठेऊन वेद शिक्षणाकडे वळतात त्याला जात. हि मुले ज्या अर्थी वेद पारंगत होतात त्या अर्थी यांना सरस्वती नक्कीच प्रसन्न असते. खरतर हि मुले जर अभियांत्रिकी किंवा वैद्यक शास्त्राकडे वळली तर आजही लोखोनी पैसे मिळवू शकली असती आणि समाजात मान सुद्धा !!! पण याकडे दुर्लक्ष करून हे ब्राह्मण पैशाची फारशी शाश्वती नसलेल्या आणि समाजात मान नसलेल्या मार्गाकडे वळतात !!!! खूप आश्चर्य वाटतंय??? "समाजात मान नसलेल्या" असे शब्द वापरले म्हणून ?? तुमच्या पैकी काही जणांच्या हे डोक्यात आल असेल कि ज्या व्यक्तींना घरी बोलावून आपण देवाला करतो तसा नमस्कार करतो त्यांना समाजात मान नाही अस मी कस म्हणू शकते ? पण आज मी खरच या विचारापर्यंत आले आहे कि यांना खरच मान आपण देत नाही आणि याला कारणीभूत आपला समाज, आणि मुख्यत: आपण ब्राह्मण लोकच आहोत.
            आता थोडा कारणांचा अभ्यास करूयात. आमच्या ओळखीतल्या एका गुरुजींची मुलगी लग्नाची होति. तिचे वडील वैदिक, घरामध्ये वैदिक धर्म सेवेचीच परंपरा, भाऊ पण वेद विद्यापीठात शिकत आहे तरीसुद्धा तिला वैदिक नवरा नकोय !! हे मला कळल तेव्हा मला वाटल कधी कधी आपल्याला अस वाटत कि काहीतरी वेगळ असाव आयुष्यात त्याप्रमाणे घरात सतत वैदिक वातावरण असल्याने तिला बदल हवा असेल पण तिच्याशी गप्पा मारण्याचा योग आला तेव्हा समजल कि प्रकरण वेगळ आहे. ती जेव्हा शाळेत होती तेव्हा तिच्या वर्गातले तिचे ब्राह्मण मित्र आणि मैत्रिणी 'हिचे वडील गुरुजी आहेत' अशी कुजबुज करायचे आणि अनेकदा मैत्रिणी कुचकट भावनेनी 'माझे वडील अमुक तमुक आहेत आणि आमच्याकडे एवढा मोठा फ्ल्याट आणि गाडी आहे' अस म्हणून मुद्दाम तिला हिणवायच्या. शाळेत फारशी अक्कल नसते अस जरी मानल तरी या सर्वांच्या घरचे सुद्धा याच तर्हेचे. मैत्रिणीचे मोठ्या हुद्द्यावरचे वडील "तुझे वडील काय करतात?" या त्यांच्या प्रश्नावर उत्तर मिळाल्यावर भुअवय उन्चवायचे आणि लगेच फारशी किंमत देता आपल्या मुलीला "तुला नवीन गाडी घायय्चीय का या वर्षी?" अस मुद्दाम कुत्सित पणे  विचारायचे. या सगळ्यामुळे या गुरुजींच्या मुलीनी लहानपणापासून मनात एकच ग्रह करून घेतला 'आपल्याला समाजात किंमत नाही, आता नवरा मात्र आपण असाच मोठ्ठ्या कंपनीतला शिकलेला पाहायचा.
           वरील किस्सा कळल्यावर मला फार वाईट वाटल. मध्ये  एकदा गप्पा मारता मारता  एक ओळखीच्या madam म्हणाल्या होत्या "आम्ही दर वर्षी गुरुजींसाठी वधू वर मेळावा ठेवतो पण दर वर्षी २०० - ३०० वैदिक पुरुष जमतात आणि मुली फक्त जेमतेम ३० - ४०. त्याहि अशा मुली ज्यांच्यामध्ये काहीतरी दोष आहे किंवा ज्यांना सगळीकडून नकार स्वीकारावा लागला आहे." हि आकड्यांची तफावत पाहता धक्का बसतो. अस का व्हाव ? बर या गुरुजींना पैसे कमी मिळतात का? खर तर तस नाहीये, एखादा अभियंता कमवू शकेल इतक सुद्धा हे लोक कमवू शकतात पण २०००० चा IT वाला चालेल पण ४०००० वाला वैदिक मुलगा नको अस आज मुली म्हणतात. आणि हेच मत मुलींच्या पालकांचं पण असत. एकदा म्हणे एका मुलीनी लग्नासाठी अशी अट ठेवली कि "माझ्याबरोबर सिनेमा पाहायला येशील तेव्हा ते धोतर नाही घालायचं, मला लाज वाटेल तुझी बायको म्हणून मिरवायला आणि दर आठवड्याला hotelling करायचं, मान्य आहे का ?" त्या वैदिकाने हे सर्व ऐकल्यावर नकार दिला.
            मला खर तर या सगळ्यामध्ये मुलींना दोष द्यायचा नाहीये कारण अशा प्रकारे त्यांना विचार करायला लावणारा आपला समाजच आहे. कारण सत्य तर हे आहे कि आपल्याला वैदिक हे समाजात फक्त 'आशीर्वाद मिळवून आपल भल करण्यासाठी' हवे आहेत. एकदा का घरी त्यांना नमस्कार केला कि घराबाहेर आपण यांना, त्यांच्या पावित्र्याला, त्यांच्या पोशाखाला आदर देत नाही. हे खूप भयाण आहे पण सत्यच आहे !!!! आपल्याला फक्त घोषणेमध्ये वैदिक धर्म आठवतो, फक्त मनात अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला वैदिक धर्म जिवंत लागतो. आणि घरामध्ये पूजा करवून आशीर्वाद घेण्यासाठी फक्त  आदर्श, सर्व पाळणारा वैदिक ब्राह्मण लागतो !!!!
           या सगळ्यावर आपण सर्वांनी चिंतन केल पाहिजे आणि काहीतरी उपाय शोधला पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यान नंतरच्या मुलांना 'भारतात पूर्वी 'वेद' नावाचे ग्रंथ गुरुजींच्या घरी राहून शिकवले जायचे पण काही वर्षांपूर्वी हि प्रथा बंद पडली' अस इतिहासाच्या पुस्तकात वाचायची वेळ येईल.

Tuesday, January 25, 2011

राधा - भक्त का प्रेयसी

             घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.
            मला मात्र त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना मी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून मला असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.
             आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -

. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.
. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.
. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते
      
एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -

'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '

       
आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावेश्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.